विजयाताई रहाटकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
विजयाताई रहाटकर यांची नुकतीच भाजपाच्या राष्ट्रीय सचिवपदी फेरनियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपा राष्ट्रीय सचिव आणि ‘आनंदी एम्पॉवर फाउंडेशन’च्या अध्यक्षा, संस्थापक विजयाताई रहाटकर यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार, २१ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे वृक्षारोपण चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
विजयाताईंच्या वाढदिवसानिमित्त सोमवार २१ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता शहरातील विविध भागात वृक्षारोपण करण्यात आले असून, पर्यावरण मित्र,निवृत्त वन अधिकारी मनोहर महाडिक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी शास्त्री नगर येथील मनपा शाळेतील मुख्याध्यापिका तसेच इतर शिक्षक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.आनंदी एम्पॉवर फाउंडेशन मधील विभावरी भालेराव, मिताली धुमाळ, सचिन गुगळे , आशिष राठोड , भाग्यश्री गोजरेकर व विद्यार्थिनींचा मोठ्या संख्येने सहभाग होता. याप्रसंगी प्रमुख पाहुणे महाडिक यांनी सर्वांना झाडे जगवा झाडे वाचवा व वृक्षसवर्धनाचे महत्व गाण्याच्या माध्यमातून सर्वांना सांगितले. तसेच अतिशय सुंदर कवितेच्या माध्यमातून विजयाताईना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या.