6 Jan 2023 : Sankranti Jatra Inauguration

आज दि. 6 जानेवारी 2023 राेजी, आनंदी एम्पॉवर फाऊंडेशन आयाेजित ‘संक्रांत जत्रे’ चा उद्घाटन साेहळा मा.न्यायाधीश सौ. आय जे नंदा आणि मा.न्यायाधिश सौ. एस.ए.सिन्हा ह्यंच्या उपस्थितीत संपन्न झाला. डॉ. विभावरी भालेराव ह्यानी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.
अँड. संगीता तांबट-धुमाळ ह्मांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. मा.विजयाताई रहाटकरांनी प्रस्ताविक केले,सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मा.अतिथींनी महिलंना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमास महिला आणि स्टॉलधारकांचा भरघाेस प्रतिसाद मिळाला
आनंदी ही स्वयंसेवी संस्था महिलांसाठी, त्यांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम आयोजित करत असते. ‘संक्रांती जत्रा’ हा असाच एक उपक्रम आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने महिलांनी बनविलेल्या गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यासाठीच्या सर्व सुविधा ‘आनंदी’ने मोफत उपलब्ध करून दिलेल्या आहेत.